Datta digambara ya ho lyrics

 Datta digambara ya ho lyrics

दत्ता दिगंबराया हो
स्वामी मला भेट द्या हो

दत्ता दिगंबरा या हो
सावळ्या मला भेटद्या हो

दत्ता दिगंबरा या हो
दयाळा मला भेटद्या हो
तापलो गड्या त्रिविध तापे
बहुविध आचरलो पापे
मनाच्या संकल्प-विकल्पे
काळीज थरथरथर कापे

कितीतरी घेऊ जन्म फेरे
सावळ्या मला भेटद्या हो
तुम्हाला कामकाज बहुत
वाट पाहू कुठवर पर्यंत
प्राण आला कंठागत
कितीतरी पाहशील बा अंत

दीनाची करुणा येऊद्या हो
नाथामलाभेटद्याहो
संसाराचा हा वणवा
कितीतरी आम्ही सोसावा
वेड लागले या जीवा

कोठे न मिळे विसावा
आपुल्यागावातरीन्या हो
दयाळा मला भेटद्या हो
स्वामी मला भेटद्या हो
दयाळा मला भेटद्या हो
सावळ्या मला भेटद्या हो
दत्ता दिगंबराया हो
स्वामी मला भेट द्या हो

0 Comments